Ad will apear here
Next
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार


रत्नागिरी : चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशाला, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांमधील माजी विद्यार्थी असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला.

वरद चंद्रशेखर पटवर्धन, प्रथमेश सुहास बाम, सिद्धांत मनोहर सुराणा, प्रसाद गोविंद मुळे आणि धनंजय किशोर गानू या पाच विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या वेळी सोसायटीचे पदाधिकारी रमेश कीर, आनंद देसाई, मनोज पाटणकर, ‘गोगटे-जोगळेकर’चे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, शिर्के प्रशालेचे रमेश चव्हाण, तसेच या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.    

नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे ही परीक्षा देण्यात आली. ‘आयसीएआय’ रत्नागिरी केंद्राच्या वतीने नोव्हेंबर २०१८ मध्ये या परीक्षा ‘गोगटे-जोगळेकर’मध्ये झाल्या. या केंद्रात या परीक्षेसाठी ५४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील पाच माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.

याशिवाय ‘आयसीएआय’ तर्फे सीपीटी सीए फाउंडेशन, आयपीसीसी याही परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षांना मिळून १००हून अधिक विद्यार्थी ‘गोगटे-जोगळेकर’ महाविद्यालयाच्या केंद्रातून प्रविष्ठ झाले. सीपीटी सीए फाउंडेशन या परीक्षेत महाविद्यालयाच्या सोनाली सुहास मुळे, कस्तुरी उदय पाटील, पूर्वा उदय जोगळेकर, श्रृती जयंत बापट, राधिका शुभंकर लोटकर या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांचेही सर्वांनी अभिनंदन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZXRBX
Similar Posts
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले
‘गोगटे-जोगळेकर’च्या विज्ञान विभागाला ‘आयएसओ’ रत्नागिरी : ‘गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. मुंबई विद्यापीठच नव्हे, तर जागतिक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी गुणवत्ता शिक्षण येथे दिले जाते, हे सिद्ध करण्यासाठी या मानांकनाची गरज आहे. आगामी काळात ग्रंथालय आणि कार्यालयीन विभागांनाही हे मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न
चांगले नागरिक घडवणे ही शिक्षणसंस्थांची जबाबदारी : श्रीपाद नाईक रत्नागिरी : ‘चांगले नागरिक घडवणे ही शिक्षणसंस्थांची जबाबदारी असून, त्यातूनच देशाचा उत्कर्ष होतो. बुद्धिमत्तेसोबत संस्कारांची जोड असावी लागते. सुजाण विद्यार्थी घडण्यासाठी संस्कारांची पेरणी महत्त्वाची आहे. यातील उल्लेखनीय कार्यामुळेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे,’ असे
‘गोगटे-जोगळेकर’च्या मराठी वाङ्मय मंडळाचे यश रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या वतीने साडवली (देवरुख) येथे जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या पाच विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language